Supreme Court’s order : मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

एमपीसी न्यूज : आताची सर्वात मोठी बातमी. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला मोठा दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाबाबत मोठा निर्णय दिला आहे. यापुढी सरकारकडून थेट निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करता येणार नाही. (Supreme Court’s order) सुप्रीम कोर्टाने थेट सरकारद्वारे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती अवैध ठरवली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारला थेट मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग नियुक्ती करता येणार नाही. यापुढे समिती स्थापन करुन ही निवड केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. 

Maval : सांगिसे पाणीपुरवठा योजनेच्या सुमारे दोन कोटींच्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या निवडीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देताना म्हटले आहे की, यापुढे समिती गठीत करुन निर्णय घेतला जावा. पंतप्रधान आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते (किंवा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता) आणि CJI यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतील.

दरम्यान, संसदेकडून कायदा होईपर्यंत ही नियुक्ती प्रक्रिया लागू राहील, असे न्यायालयाने सरकारला सांगितले आहे. केंद्राने ECI ला एकत्रित निधीतून निधी देण्यासाठी आवश्यक बदल करावेत आणि स्वतंत्र सचिवालय निर्माण करावे, असेही म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.