Bhor : स्वारगेटहून चिपळूणला निघालेली मिनी बस 50 ते 60 फूट खोल दरीमध्ये कोसळली; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – स्वारगेट येथून चिपळूणला निघालेली मिनी बस भोर (Bhor) महाड वरंधा घाटात पलटली. यामध्ये चार प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 8) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली.

Maharashtra : शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यापारी वर्गाच्या हितासाठी केंद्र शासनाचे सकारात्मक निर्णय – दीपक केसरकर

भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतरा सीटर मिनी बस (एमएच 08/ एपी 1530) स्वारगेट येथून चिपळूणला जात होती. यावेळी बस मध्ये दहा प्रवासी होते. बस स्वारगेट भोर महाड मार्गे चिपळूणकडे जात होती. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास बस भोर महाड वरंधा घाटात आली. शिरगावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस 50 ते 60 फूट खोल दरीमध्ये कोसळली.

या अपघातात अजिंक्य संजय कोलते ( रा. धनकवडी पुणे)  हे मयत झाले आहेत. तर राजेंद्र लाला मिसाळ (पद्मावती पुणे), रमेश तुकाराम महाडिक ,सुभाष कदम (रा. पुणे) , करिष्मा उत्तम कांबळे (रा. सिंहगड पुणे ) यांना पुण्याला  उपचारासाठी हलवले आहे.

घटनेची माहिती मिळताच भोर रेस्क्यू, भोर पोलीस, शिरगाव येथील पोलीस मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.