Bhosari : मी इथला गाववाला आहे म्हणत महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – रस्त्यावर उभी असलेली (Bhosari) गाडी बाजूला घेण्यासाठी पाठीमागून आलेल्या महिलेने हॉर्न वाजवला. त्यावरून समोरील कारमधील तिघांनी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. मी इथला गाववाला आहे, असे म्हणत महिलेसोबत गैरवर्तन करून विनयभंग केला. हा प्रकार गुरुवारी (दि. 15) दुपारी आळंदी रोड, भोसरी येथे घडला.

किरण बबन कोतवाल (वय 32), कमलेश बबन कोतवाल (वय 34), कमल बबन कोतवाल (वय 57, सर्व रा. भोसरी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad News: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास आळंदी रोडने जात होत्या. ओक्सी एलिगन्स सोसायटीच्या समोर एक कार उभी असल्याने फिर्यादींनी कार बाजूला घेण्यासाठी हॉर्न वाजवला. त्यावेळी कारमधून उतरलेल्या तिघांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. तू पोलिसवाली आहे का, तू युनिफॉर्ममध्ये आहे का. पोलिसांची यात्रा जमव इथे तुझा खून करतो. तुझ्या बापाला वर येऊ देणार नाही. तू उद्या दिसणार नाही, अशी धमकी देत आरोपीने फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करून तिच्याशी गैरवर्तन (Bhosari) करत त्यांचा विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.