Chinchwad News: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Chinchwad News) यांच्या 83 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी आज (शुक्रवारी) मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजी महापौर मंगला कदम यांच्या हस्ते झाले.

Talegaon Dabhade : रोटरी सिटीतर्फे तळेगाव भूषण व कर्तव्यदक्ष पुरस्कार प्रदान

शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात आज दिवसभर हे शिबिर चालू राहणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, ओबीसी सेलच्या महिला अध्यक्षा सारिका पवार, अशोक कदम, ज्योती गोफणे, मनीषा गटकळ, ज्योती जाधव, कुशाग्र कदम आदी उपस्थित होते.

या शिबिरात 18 वर्षापुढील महिलांची माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेअंतर्गत (Chinchwad News) तपासणी करण्यात येणार आहे. त्यात ब्लड ग्रुप, सीबीसी, बीएसएल, केएफटी, एलफटी, हॅपीड प्रोफाईल, थायरॉड, युरिक ऍसिड, युटी अशा चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. परिसरातील महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.