Lonavala : कुसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह पाच सदस्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : लोणावळा (Lonavala) शहराच्या लगत असलेल्या कुसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय तुकाराम गुंड (वय 42, रा. कुसगाव, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीवरून कुसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड रा. कुसगाव, 2) उपसरपंच सुरज दत्ता केदारी रा. श्रमदान नगर ओळकाईवाडी, 3) राजेश बबन काटकर, रा. ओळकाईवाडी, 4) मंदाकिनी जालिंदर झगडे, रा. कुसगाववाडी, 5) शैला भरत मोरे, रा. प्रेमनगर, 6) सुजाता रामचंद्र ठुले, रा. क्रांतीनगर, 7) फरीन मज्जीद शेख, रा. गुरववस्ती यांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि. कलम 420, 465, 467, 468, 471, 120(ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : मी इथला गाववाला आहे म्हणत महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या तिघांना अटक

30 जून ते 27 जुलै दरम्यान कुसगाव ग्रामपंचायतचे (Lonavala) सरपंच, उपसरपंच व वरील सदस्यांनी संगणमत करून दिनांक 30 जून रोजी घेतलेल्या सभेच्या अजेंड्यामध्ये विषय क्रमांक 5 मधील अर्ज क्रमांक 28 मध्ये रिकाम्या ओळी सोडून अजेंडा पुर्ण करून त्यानंतर रिकाम्या सोडलेल्या ओळीमध्ये मी कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिलेला नसताना त्यांनी माझे ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा लिहून त्यावर माझी खोटी सही करून तो खरा असल्याचा भासवून, सदरचा राजीनामा अर्ज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पाठवून माझा विश्वासघात करून माझे ग्रामपंचायत सदस्य पद रिक्त करून माझी फसवणुक केली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य संजय गुंड यांनी फिर्यादीमध्ये म्हंटले आहे.

याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.