Hinjawadi : रोख रक्कम व गाडीसाठी विवाहितेचा छळ; हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – रोख रक्कम (Hinjawadi) व गाडीसाठी विवाहितांचा छळ झाल्याच्या दोन तक्रारी हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. यावरून पती व सासरच्यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत हुंड्यापोटी सासरच्या लोकांनी विवाहितेकडे एक कोटी रुपये माहेरहून आणण्याची मागणी केली. पैसे घेऊन येण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार जुलै ते 14 डिसेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी फेज तीन येथे घडला.

पती नवीनकुमार इंद्रपालसिंग (वय 30), सासरे इंद्रपालसिंग (वय 70), सासू (वय 70), दीर सुनीत कुमार (वय 28, सर्व रा. उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे घेतले. तसेच विवाहितेकडे माहेरहून एक कोटी रुपये आणण्याची मागणी केली. पैसे आणण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

Lonavala : कुसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचासह पाच सदस्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

दुसऱ्या घटनेमध्ये विवाहितेकडून पैसे घेऊन (Hinjawadi) तिच्याकडे आणखी पैशांची मागणी करत तिचा छळ केला. हा प्रकार नोव्हेंबर 2018 ते 17 मार्च 2022 या कालावधीत बेंगलोर, कर्नाटक येथे घडला. पीडित महिलेने माहेरी आल्यानंतर याबाबत फिर्याद दिली आहे.

पती गिरींद्रचंद्र भवानी प्रसाद (वय 36), सासू (वय 65), सासरे भवानी प्रसाद नाथ (वय70), नणंद (वय 41), नणंदेचा पती अभिजित सैकिया (वय 41, सर्व रा. बेंगलोर, कर्नाटक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी विवाहितेकडून वेळोवेळी वाहन खरेदी करण्यासाठी पैसे घेतले. त्यानंतर माहेरहून दहा लाख रुपये आणावेत यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दोन्ही प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.