Lonvala : लायन्स व टायगर पॉईंट येथे निर्माण होणार स्काय वॉक

एमपीसी न्यूज – लोणावळ्यापासून 15 किलोमीटर (Lonvala) अंतरावरील प्रसिद्ध लायन्स व टायगर पॉईंट येथे स्काय वॉक विकसित करण्यात येणार आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून लोणावळा परिसर पर्यटन क्षेत्र विकासासाठी लोणावळ्यापासून 15 किमी अंतरावरील प्रसिद्ध लायन्स व टायगर पॉईंट येथे स्काय वॉक विकसित करण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील वन विभागाच्या मौजे आतवन येथील राखीव वन गट नं. 166 मधील 8 हेक्टर क्षेत्रात हा स्काय वॉक पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विकसित केला जाणार आहे.

Kiwale : युवा पिढीला शिवरायांच्या पराक्रमाची जाणीव व्हावी यासाठी किल्ला स्पर्धा आवश्यक – नाना शिवले

पर्यटन विकास विभागाकडून वित्त पुरवठा केला जाणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या (Lonvala) अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.