Lonavla : नायगावजवळ इंद्रायणी नदीपात्रात बुडून दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : नायगाव गावाच्या (Lonavla) हद्दीमध्ये आज सकाळी इंद्रायणी नदीपात्रात बुडून माय लेकरांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. पूनम दिनेश शिंदे (वय 38) व युवराज दिनेश शिंदे (वय 14, दोघेही रा.कामशेत, त‍ा.मावळ) अशी या मृतांची नावे आहेत. 

Pimpri News: हप्ता दिला नाही म्हणून चाकू दाखवत अल्पवयीन मुलांकडून धमकी

कामशेत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार सकाळी शिंदे माय लेक इंद्रायणी नदी पात्रात गोधड्या धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी युवराज हा पाण्यात पडला त्याला वाचविण्यासाठी आई पूनम हिने पाण्यात उडी मारली. ते दोघेही पाण्यात बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी पूनमचा भाऊ अक्षय टाकवे व दाजी विजय लालगुडे यांनी त्या दोघांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी कामशेत येथील एका खाजगी रूग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच ते (Lonavla) मयत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.