Bhosari Crime News : घरात न घेतल्याच्या कारणावरून विभक्त राहणाऱ्या पत्नीवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पती-पत्नी विभक्त राहत असल्याने पत्नीने पतीला घरात घेतले नाही. घरात न घेतल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला रस्त्यात अडवून सकाळच्या वेळी तिच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 24) सकाळी गवळीनगर, भोसरी येथे घडली.

सखू दिगंबर काळे (वय 36, रा. गवळीनगर, भोसरी) असे जखमी पत्नीचे नाव आहे. त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जगदीश उर्फ कुमार गणपत जाधव (वय 48, रा. रोशनगार्डनच्या जवळ, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. ते एकमेकापासून विभक्त राहत आहेत. फिर्यादी यांनी आरोपी पतीला घरात घेत नसत. त्या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांना शनिवारी सकाळी सात वाजता गवळीनगर येथे रस्त्यात अडवले. त्यानंतर फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार केले. यात फिर्यादी जखमी झाल्या. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.