Bhosari News : राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालून टेम्पो चोरीला  

एमपीसी न्यूज – भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलखालून चार लाख रुपये किंमतीचा टेम्पो चोरीला गेला आहे. बुधवारी (दि.20) अंकुशराव लांडगे सभागृहासमोर ही घटना घडली.

चालक विजयभान देशराज सिंग (वय 31, रा. भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी (MH 14 GU 6377) हा त्यांचा टेम्पो भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलखाली लॉक करून पार्क केला होता. अज्ञात चोरट्याने हा टेम्पो चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.