Pune News : पथारी व्यावसायिकांच्या पाहणीला कधी होणार; एक वर्षे उशिर झाला असल्याचे संघटनांचे म्हणणे

एमपीसी न्यूज – शहरामधील अतिक्रमणांवर कारवाईला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. अनेक पथारी व्यावसायिकांवर कारवाई होत आहे. असे असले तरी महापालिका प्रशासन मात्र नव्याने पथारी व्यावसायिकांचे सर्व्हेक्षण करण्यास तयार नाही. 2020 मध्ये सर्व्हेक्षण होणे आवश्यक होते मात्र याला एक वर्षाचा उशिर झाला आहे.

 

केंद्र सरकारने पथारी व्यावसायिकांना संरक्षण मिळावे यासाठी 2009 मध्ये राष्ट्रवादी पथारी व्यावसायिक धोरणाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे पथारी व्यावसायिकांना कायदेशिर व्यावसाय करण्याचे हक्क मिळाले आहेत. शहरातील लोकसंख्येच्या 2 टक्केच्या प्रमाणात मान्यता आहे. त्यामुळे दर पाच वर्षांनी शहरातील पथारी व्यावसायिकांचे सर्व्हेक्षण केले पाहिजे असे धोरण आहे.

 

शहरातील पथारी व्यावसायिकांचे सर्व्हेक्षण 2020 मध्ये होणे आवश्यक होते. मात्र अद्याप महापालिका प्रशासनाकडून सर्व्हेक्षणासंदर्भात हालचाली सुरु झाल्या नाहीत. महापालिका प्रशासन कारवाई करते मग व्यावसायिकांचे सर्व्हेक्षण का करत नाही असे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

 

पथारी व्यावसायिक धोरणानुसार पथारी व्यावसायिकांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. त्यांना महापालिकेेने कायद्यानुसार संधी देणे आवश्यक आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्यामुळे नागरिकांनी व्यवसाय सुरु केले. महापालिकेने दर पाच वर्षांनी सर्व्हेक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे तत्काळ सर्व्हेक्षण सुरु करावे, अशी मागणी अनेक पथारी व्यावसायिक संघटनांकडुन  करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.