Bhosari: एज्युकेशन वर्ल्ड संस्थेतर्फे प्रियदर्शनी शाळेचा सन्मान

एमपीसी न्यूज – भोसरी, इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेचा बजेट प्रायवेट कॅटॅगिरीमध्ये पुणे विभागातून पहिला क्रमांक पटकाविला आहे. त्यानिमित्त एज्युकेशन वर्ल्ड संस्थेतर्फे शाळेचा सन्मान करण्यात आला.

दिल्लीतील एका कार्यक्रमात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी मुख्याध्यापिका डॉ. गायत्री जाधव, अर्पिता मेगेरी उपस्थित होते.

राजेंद्र सिंग म्हणाले, “काळाची गरज आणि उत्तम क्षिक्षण मुलांना मिळावे हा आशावाद मनात ठेऊन प्रियदर्शनी शिक्षण संस्थेची 15 ऑगस्ट 1982 मध्ये स्थापना झाली. प्रत्येकाच्या कष्टाळू आणि प्रामाणिकपणे काम करण्याचे हे उत्तुंग यश मिळाले आहे. बजेट प्रायवेट कॅटॅगिरी मध्ये प्रियदर्शनी शाळेला पुणे विभागातून पहिला क्रमांक मिळाला आहे. तर, महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर आणि संपूर्ण भारतामध्ये ही शाळा दहाव्या स्थानावर आहे. भारतातील एकूण चार लाख शाळेतून तिचे स्थान दहावे आले आहे”

“शाळेत काम करणा-या प्रत्येकाला याचा अभिमान आहे. ही शाळा म्हणजे एक संस्था नव्हे तर एक कुटुंब म्हणून काम करत आहे. या कुटुंबात असणारा पालक वर्ग यांचा विश्वास आणि सहकार्य यामुळे आज आपली शाळा ही या प्रगतीपथावर पोहोचली आहे. याचा आम्हाला विशेष अभिमान आहे”, असेही सिंग म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.