Bhosari : शुन्य कचरा झोपडपट्टी मोहिमेत बचत गटांना दिलेली संधी महत्त्वाची – डॉ. इंदू जाखड

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या शुन्य कचरा झोपडपट्टी या (Bhosari) प्रकल्पात महिला बचत गटांना दिलेली संधी महिला विकासासाठी महत्वाची असल्याचे मत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. इंदू जाखड यांनी व्यक्त केले

महापालिकेच्या नवी दिशा योजनेअंतर्गत शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प, गवळीमाथा, भोसरी या ठिकाणी डॉ. इंदू  यांनी आज (गुरुवारी) भेट दिली. माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी अर्चना क्षीरसागर, सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी वंदना कवटे, प्रकल्प सल्लागार अश्विनी संगेकर, कनक खरे, गौरव काळे उपस्थित होते.

या  प्रकल्पाचे व्यवस्थापन करणा-या महिला बचत गटांकडून (Bhosari) प्रकल्पाच्या अनुषंगाने ओला/सुका कचरा अलगीकरण व खतनिर्मिती बाबतची माहिती डॉ. इंदू जाखड यांनी घेतली.

प्रभाग क्रमांक 8 मधील गवळीमाथा येथील दैनंदिन निर्माण होणा-या ओल्या कच-यापासून तयार झालेले खत महापालिकेच्या उद्यानांत वापरले जाते. महापालिकेस खत खरेदीकरिता येणा-या खर्चात बचत होत असल्याची माहिती क्षेत्रीय अधिकारी  अण्णा बोदडे यांनी दिली.  झोपडपट्टी, शुन्य कचरा प्रकल्पाची व शुन्य कचरा कार्यालय उपक्रम याची माहिती दिली.

Maharashtra News : कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी 28 आणि 30 एप्रिल रोजी मतदान

या प्रकल्पांची यशस्वी गाथा त्यांनी यावेळी महिला बचत गटाच्या महिलांकडून जाणून घेतली. तसेच त्यांचे या अभिनव उपक्रमाबाबत अभिनंदन केले. सहाय्यक आरोग्याधिकारी तानाजी दाते, आरोग्य निरिक्षक क्षितिज रोकडे, राजेंद्र उज्जनवाल, संजय मानमोडे तसेच श्रीकृष्ण महिला बचत गटातील मंगल वाडकर, संगिता बदाले व इतर महिला सदस्यांकडून डॉ. इंदू जाखड यांचा शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.