Maharashtra News : कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी 28 आणि 30 एप्रिल रोजी मतदान

एमपीसी न्यूज – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत 253 कृषि उत्पन्न बाजार समित्याची (Maharashtra News) निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यतील 18 बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 235 बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. 147 बाजार समित्यांचे मतदान 28 एप्रिल तर 88 बाजार समित्यांचे मतदान 30 एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी दिली.

या निवडणुकीअंतर्गत एकूण 4 हजार 590 जागा निवडून द्यायच्या होत्या. त्यापैकी सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये 2 हजार 805 पदांपैकी 18 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जागांसाठी 6 हजार 230 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदार संघात 1 हजार 20 पदांपैकी 21 जागा बिनविरोध झाल्या असून 2 हजार 457 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. व्यापारी/अडते मतदार संघात 510 पदांपैकी 49 बिनविरोध तर उर्वरित जागांसाठी 1 हजार 52 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हमाल/मापारी मतदार संघामध्ये 255 पदांपैकी 64 जागा बिनविरोध झाल्या असून 606 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

28 एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या 147 कृषी उत्पन्न बाजार (Maharashtra News) समित्यांपैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी 28 एप्रिल रोजी, 95 समित्यांची मतमोजणी 29 एप्रिल रोजी तर 15 समित्यांची मतमोजणी 1 मे रोजी होणार आहे. 88 पैकी 78 समित्यांची मतमोजणी 30 एप्रिल रोजी तर 10 समित्यांची मतमोजणी 1 मे रोजी होणार आहे.

Maharashtra News : सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत सुखरूप दाखल

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान 28 एप्रिल रोजी
तब्बल 12 वर्षांनी होत असलेल्या मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात आहेत. दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. 28 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.