Pune: पोलीस विभागाने लोकसभा निवडणूकीत कायदा व सुव्यवस्थेची चोख जबाबदारी बजवावी-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे

एमपीसी न्यूज – प्रत्येक निवडणूक प्रक्रियेत पोलीस विभागाची महत्वपूर्ण जबाबदारी  (Pune)असते. आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्थेची चोख जबाबदारी बजावावी, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत 206 पिंपरी विधानसभा मतदानसंघाच्यावतीने(Pune) निगडी येथील पोलीस मुख्यालयाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना श्री. चौबे बोलत होते.

 

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. दिपक सिंगला, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, मतदान नोंदणी अधिकारी विनोद जळक, नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, तहसीलदार जयराज देशमुख, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पोलीस दलातील जवान, कर्मचारी उपस्थित होते.

श्री. चौबे म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी मतदानाचा हक्क बजावणेही महत्वाचे आहे.

 

Panvel : ‘अब की बार चार सौ पार’च्या घोषणांमध्ये पनवेलमध्ये भाजपकडून बारणे यांचे स्वागत

यासाठी येत्या 13मे रोजी शहरात होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही श्री.चौबे यांनी केले.

डॉ. सिंगला म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आणि ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. विविध जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून पिंपरी चिंचवड शहरात कामकाज करण्यासाठी येणाऱ्या आणि शहराबाहेर मतदान असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोस्टल मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस जवानांनी मतदानाची शपथ घेतली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.