Pimpri-chinchwad : विनाकारण मारहाण करत तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – कोणतेही कारण नसताना तीन जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण करून  त्याच्यावर  कोयत्याने वार केले. ही घटना (Pimpri-chinchwad) रविवारी (दि. 31 March) रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास दत्तनगर (Pimpri-chinchwad) येथे घडली.
रुपेश राजेंद्र  दनाने    (वय 24, रा. शंकर नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार,अवि पवार (वय 21), स्वप्निल शोभाजी कांबळे (वय 22), सागर सुभाष शिंदे (वय 22, रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी काहीही कारण नसताना फिर्यादी रुपेश यांना शिवीगाळ करून  हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.  तसेच, आरोपी अवि पवार हा रुपेश  यांच्यावर कोयत्याने वर करत असताना स्वतःच्या बचावासाठी रूपेशने कोयता हातात धरून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.  रुपेश यांचा जीव जरी वाचला असला तरी त्यांच्या दोन्ही हाताला दुखापत झाली आहे.

Chikhali : प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम शाळेत मातृ मंदिर वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपरी – चिंचवड  मध्ये    मागील काही दिवसांपासून  गुन्ह्यांचे  प्रमाण प्रचंड वाढलेले आहे तरी  पिंपरी-चिंचवड पोलिसांनी  तत्परतेने पावले उचलून  आरोपींना (Pimpri-chinchwad)  कडक शासन केले पाहिजे असे मत  स्थानिकांकडून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.