Chikhali : प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम शाळेत मातृ मंदिर वर्धापन दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – चिखली येथील प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम शाळेमध्ये (Chikhali)उभारण्यात आलेल्या मातृ मंदिरचा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. 
प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद केंद्राच्या संचालिका अरुणा मराठे, संस्थापक व कार्यवाह(Chikhali) यादवेंद्र जोशी, प्राचार्य अपर्णा गोवंडे, राजेंद्र ठाकूर, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
भारताच्या मातृभूमीच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी पद्य सादर केले. सुमुख जोशी या विद्यार्थ्याने विवेकानंदांच्या उताऱ्याचे वाचन केले. शिक्षिका नीता शिवतारे यांनी विवेकानंदांच्या संदेशाचे वाचन केले.

अरुणा मराठे म्हणाल्या, “मुले ही देशाचे आधारस्तंभ आहेत. घेतलेल्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करावा. देशाला बलवान तेजस्वी व राष्ट्रप्रेमी युवक हवे आहेत. वागण्यामध्ये नियमितपणा आवश्यक आहे. प्राणायामाने बुद्धी स्थिर होते. आपले आयुष्य आपणच घडवायचे आहे. मोबाईलच्या आहारी जाऊ नका. मन, मनगट व मेंदू बलशाली बनवा. तुम्हीच भारताला विश्वगुरू बनवणार आहात असे त्या म्हणाल्या.

यादवेंद्र जोशी म्हणाले, “मोठी स्वप्ने पाहणे व ती पूर्ण करण्याकरता दरवर्षी प्रेरणा घेत राहिले पाहिजे. सातत्याने काम केले पाहिजे. यासाठीच शाळेत मातृ मंदिर उभारले आहे. देशाच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य समर्पित करायचे आहे. अनेक क्षेत्रात देशाला पुढे नेले पाहिजे. चांगल्या गोष्टींची सुरुवात आपल्यापासूनच करा. चांगला नागरिक बना व समाजातील सुखदुःखात सहभागी व्हा.
स्वदेश स्वधर्म व स्वभाषा यांचा अभिमान धरायला हवा. संस्कृतीचा वारसा जपा. छत्रपती शिवरायांना स्वकियांचा व परकीयांचाही खूप विरोध झाला. तरीही त्यांनी खूप मोठे काम केले. अनेक देशातल्या स्वातंत्र्यवीरांना शिवरायांपासून प्रेरणा मिळाली असल्याचेही जोशी म्हणाले. प्रास्ताविक अपर्णा गोवंडे यांनी केले. नीता शिवतारे यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.