Pune Police : खडकीत केला महिलेचा खून, आरोपीला कर्नाटकातून अटक

एमपीसी न्यूज : पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार (Pune Police) दिवसांपूर्वी एका महिलेचा चाकूने वार करून खून करण्यात आला होता. खून केल्यानंतर आरोपी परराज्यात पसार झाला होता. दरम्यान खडकी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला कर्नाटक राज्यातून अटक केली आहे.

आरोपीने एकतर्फी प्रेमातून त्या महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे. नासेर बिराजदार (रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, रजनी राजेश बैकेल्लु (वय 44, बोपोडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिलेच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर पतीच्या जागी अनुकंपा तत्वावर त्या खडकीतील दारुगोळा कारखान्यात नोकरीला लागल्या होत्या.

Bhosari : शुन्य कचरा झोपडपट्टी मोहिमेत बचत गटांना दिलेली संधी महत्त्वाची – डॉ. इंदू जाखड

कारखान्यात कामाला येताना त्या आरोपीच्या रिक्षात येत होत्या. यातून त्यांच्यात ओळख निर्माण झाली. या ओळखीतून आरोपी रजनी यांच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. मात्र रजनी त्याला दाद देत (Pune Police) नव्हत्या. हाच राग मनात भरून आरोपीने सोमवारी सकाळी त्यांच्यावर दारुगोळा कारखान्यासमोरच चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या रजनी यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

दरम्यान खून केल्यानंतर आरोपी नासेर फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच तांत्रिक तपासावरून तो कर्नाटकातील विजापूर येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली.

या नुसार पथकाने विजापूर येथून आरोपी नासेर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. पोलिसांकडून त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.