BJP : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

एमपीसी न्यूज – शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्षे जंगलात राहणारा राम शिकार करायचा. रामाने 14 वर्षे वनवास भोगला, मग तो शाकाहारी कसा असू शकतो?’’ असे विधान करणा-या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपने (BJP) आंदोलन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे आंदोलन केले. यावेळी आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पक्ष प्रवक्ते राजू दुर्गे, उपाध्यक्ष सिद्धेश्वर बारणे, आशा काळे, रवी देशपांडे, विनोद मालू, सरचिटणीस संजय मंगोडेकर, शैला मोळक, नामदेव ढाके, महिला मोर्च्याच्या सरचिटणीस वैशाली खाडये, युवा मोर्च्याचे अध्यक्ष तुषार हिंगे, माजी नगरासेविका योगिता नागरगोजे, प्रमोद ताम्हणकर, बाळासाहेब भुंडे, कार्यकारिणी सदस्य गणेश वाळुंजकर, मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर, संतोष तापकीर, रवी नांदुरकर, राजेंद्र बाबर, प्रसाद कस्पटे, सोमनाथ भोंडवे, क्रीडा प्रकोष्ठचे जयदीप खापरे, अभियंता सेलचे दीपक भंडारी, पंचायतराजचे अभिजित बोरसे, उत्तर भारतीय आघाडी प्रमुख आकाश भारती, भटके विमुक्तचे गणेश ढाकणे, कायदा सेलचे ऍड. गोरखनाथ झोळ, ऍड. दत्ता झुळूक, कामगार आघाडीचे अध्यक्ष नामदेव पवार, सामाजिक कार्यकर्ते समीर जवळकर, युवराज ढोरे, रणजित कलाटे, सीमा चव्हाण, मंगेश नढे, मुकेश चुडासामा, दीपक नागरगोजे, शिवम डांगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Maharashtra : मोदी आवास घरकूल योजनेअंतर्गत 865 पात्र लाभार्थीना घरकुल मंजूर

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे सातत्याने सनातन धर्मावर टीका करतात. सनातन धर्मावर टीका करून कुणाची खुष्मस्कारी करतात, हे (BJP) वेगळे सांगायची गरज नाही. मुद्दाम सनातन धर्माविषयी बेताल वक्तव्ये करणे, त्यातून वाद निर्माण करणे, समाज-समाजामध्ये तणाव वाढविताना आपली पोळी भाजून घेणे यासाठीच जितेंद्र आव्हाड प्रसिद्ध आहेत. त्यांनी यापूर्वी देखील अनेकदा अशी निराधार वक्तव्ये त्यांना भोवली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.