Pune : केंद्र सरकारने तयार केलेल्या नविन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी राज्यातील शैक्षणिक संस्थांनी करावी – प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने तयार केलेल्या नविन शैक्षणिक धोरणांची ( Pune ) अंमलबजावणी शालेय स्तरावर डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेसोबत राज्यातील शैक्षणिक संस्थांनी करावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. 

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या  नवीन मराठी शाळेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा  सांगता समारोह मोठया उत्साहात पार पडला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,अविनाश धर्माधिकारी, संस्थेचे अध्यक्ष  शरद कुंटे उपस्थित होते. यावेळी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेतील मुलांचे औक्षण  मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी केले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.

BJP : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

तसेच यावेळी झेप 125 वर्षांची  या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मातृभाषेतुन शिक्षण हे महत्वाचे असुन शालेय स्तरावरही मातृभाषेतुन शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाल्यास त्यांची शैक्षणिक वाटचाल सुकर होते.

या करता केंद्र सरकारनेही शालेय वयातच मातृभाषेतुन शिक्षण देण्याबाबत नविन शैक्षणिक धोरणात याबद्दलचा आग्रह धरला असून आता महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठे नविन शैक्षणिक धोरण राबवित आहे. त्यामुळे शालेय शिक्षण संस्थानीही यात सहभागी होऊन या धोरणाची अंमलबजावणी केल्यास मुलांना चांगल्या शिक्षणाचे धडे गिरविता येईल अस प्रकाश जावडेकर  ( Pune ) यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.