Pimpri : दारू विक्री प्रकरणी सराईत गुन्हेगार स्थानबद्ध 

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी (  Pimpri ) एका सराईत गुन्हेगारास स्थानबद्ध करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (एक्साइज) पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

निरंजन संजय गोतारणे (वय 29, रा. गोल्डन चौक, चाकण) असे स्थानबद्ध केलेल्याचे नाव आहे.

Pune : केंद्र सरकारने तयार केलेल्या नविन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी राज्यातील शैक्षणिक संस्थांनी करावी – प्रकाश जावडेकर

गोतारणे हा बेकायदेशीर हातभट्टी दारु विक्री करत असल्याने एक्साइजच्या पुणे विभागाकडून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच त्याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्याच्या सूचना एक्साइजच्या पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी सूचना केली. त्यानुसार प्रस्ताव तयार करून 17 ऑगस्ट 2023 रोजी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे सादर करण्यात आला.

पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंध शाखा (पीसीबी) आणि गुन्हे कार्यप्रणाली विभागाकडून (एमओबी) प्रस्ताव त्रुटीविरहीत करण्यात आला. त्यानंतर 29 डिसेंबर 2023 रोजी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गोतारणे याच्या स्थानबद्धतेचे आदेश दिले. त्यानुसार गोतारणे याला 30 डिसेंबर रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात (  Pimpri )आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.