Today’s Horoscope 05 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope 05 January 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शुक्रवार.

तारीख 05.01.2023.

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – चित्रा 19.50 पर्यंत नंतर स्वाती.

चंद्र राशी – तूळ.

—————————–

मेष – ( शुभ रंग – पिस्ता )

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने आज तुम्ही कार्यक्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची तुम्हाला खंबीर साथ राहील.

वृषभ – ( शुभ रंग- आकाशी)

आज कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमची काही येणी असतील तर ती मात्र वसूल होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की लाभेल.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)

कलावंत मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी तुम्ही जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्न सोडवणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे आवश्यक राहील. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

सिंह -( शुभ रंग – गुलाबी)

शेजार्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर रागावर ताबा ठेवा. मुलांनी आईच्या आज्ञेत रहावे.

कन्या – ( शुभ रंग- भगवा)

वाढत्या खर्चातही आज पैशाची कमतरता जाणवणार नाही. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल. काही येणी असतील तर दिवसाच्या उत्तरार्धात वसूल होतील.

तूळ – ( शुभ रंग- राखाडी)

आज अति उत्साहाच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवर तरुण तरुणी सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल.

वृश्चिक – ( शुभ रंग – जांभळा)

आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी कराल. आज संध्याकाळी हरवलेले सापडेल.

धनु – (शुभ रंग- सोनेरी)

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमच्या शब्दाला मान देतील. दिवसाच्या पूर्वार्धात काही लाभ संभवतो.

मकर- ( शुभ रंग – क्रीम)

आज तुम्ही भावने पेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात काही महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होणार आहेत. कुटुंबीयांना वेळ देणे अवघडच जाईल.

कुंभ – (शुभ रंग- निळा)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. थोरामोठ्यांचा आज मान राखावा लागेल.

मीन – ( शुभ रंग- चंदेरी)

आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हितशत्रू कदाचित तुमच्या मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज टाळा. सदैव सतर्क रहा.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन- 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.