Maharashtra : मोदी आवास घरकूल योजनेअंतर्गत 865 पात्र लाभार्थीना घरकुल मंजूर

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे (Maharashtra) इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थीकरिता राबविण्यात येणाऱ्या मोदी घरकूल योजनेअंतर्गत 865 पात्र लाभार्थीना घरकुल मंजूर करण्यात आले.

मोदी आवास घरकूल योजना ग्रामीण 2023-24 अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील 865 पात्र बेघर लाभार्थीना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते घरकुलासाठी ऑनलाईन मंजुरी देण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू तसेच सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी उपस्थित होते.

Pune : वनदेवी मंदिरामध्ये मनोरुग्णाने मंदिरात गोंधळ घालत महिलेशी केले गैरवर्तन

या लाभार्थीना तालुकास्तरावरून थेट लाभार्थीच्या खात्यात टप्पानिहाय घरकुलाचे अनुदान जमा केले जाईल. या सर्व लाभार्थीचे घरकुलाचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याचे (Maharashtra) निर्देश चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. संबंधित सर्व लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम त्वरीत सुरु करुन किमान कालावधीत पूर्ण करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

इच्छुक पात्र नागरिकांनी अधिक माहितीसाठी पंचायत समितीशी संपर्क साधावा आणि ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीत अर्ज सादर करावा, असे आवाहन कडू यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.