Vijay Paradkar: प्रत्येक व्यंगचित्रकाराची शैली वेगळी, अनाकलनीय : विजय पराडकर

एमपीसी न्यूज: कार्टूनिस्टस् कम्बाइन’ आणि गंगोत्री होमसॲन्ड हॉलिडेज आयोजित ‘सलाम हसऱ्या रेषांना’ व्यंगचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (Vijay Paradkar) प्रत्येक व्यंगचित्रकाराची शैली वेगळी, अनाकलनीय असते. शब्दांसह, शब्दविरहित असे चित्रांचे प्रकार असले तरी त्यात तुलना होऊ शकत नाही. आषय व्यक्त होण्यासाठी शब्दांची आवश्यकता असते, चित्राखालील ओळीतून शब्द हवेत असे माझे मत आहे. व्रत म्हणून व्यंगचित्र काढत आलो आहे. व्यंगचित्रकाराकडे जादूचा चश्मा असतो तो माझ्याकडेही आहे. या जादूच्या चष्म्यामुळे मला व्यक्तीची मागील बाजूही दिसते ती विनोदाची असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार विजय पराडकर यांनी केले.

 

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा वाढदिवस आणि त्यांच्या शब्दविरहित हास्यचित्रांच्या कारकिर्दीलाही 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व्यंगचित्रांच्या दुनियेतील त्यांच्या या प्रवासाला सलाम करण्यासाठी ‘कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइन’ या मराठी व्यंगचित्रकारांची संघटना (Vijay Paradkar) आणि गंगोत्री होमस् ॲन्ड हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व कलादालनात ‘सलाम हसऱ्या रेषांना’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

प्रदर्शनातील अखेरच्या दिवशी पराडकर यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संवादाचा विषय होता भाषा रेषांची. त्यावेळी त्यांनी नोकरी ते व्यंगचित्रकार असा प्रवास उलगडला. पराडकर यांच्याशी ‘कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइन’चे अध्यक्ष संजय मिस्त्री आणि सचिव योगेंद्र भगत यांनी संवाद साधला. गंगोत्री होमस्‌‍ ॲन्ड हॉलिडेजचे संचालक मकरंद केळकर यांनी पराडकर यांचा सृतीचिन्ह देऊन सत्कार केला. ‘कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइन’चे माजी अध्यक्ष चारुहास पंडित तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Dance Festival: डान्स फेस्टिव्हल मध्ये कथक,भरत नाट्यम् चे प्रभावी सादरीकरण

 

व्यंगचित्रकाराकडे अपघाताने वळलो असे सांगून पराडकर म्हणाले, लहानपणापासून विनोदी साहित्य वाचनाची तसेच चित्र काढण्याचीही आवड होती. वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढत होतो. स्पर्धेत पाठविलेल्या चित्राला पारितोषिक मिळाल्यानंतर या कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. नोकरी करता करता व्यंगचित्र काढत होतो.निवृत्त झाल्यानंतर 1996 नंतर पूर्णवेळ या कलेला वाहून घेतले. चित्र काढण्याची कल्पना कशी सुचते हे सांगता येत नाही पण हाती कागद घेतला की चित्र कागदावर उतरतात.दीडदोन तासात 17 चित्र काढली असल्याची आठवण त्यांनी सांगितली. शाळेतील आठवण सांगताता ते म्हणाले, शिक्षकांनी चित्र काढायला सांगितले होते, सगळी मुले चित्र काढत असताना मी वाकड्यातिकड्या रेषा काढून चित्र काढत होतो.

 

 

 

त्यावेळी शिक्षक माझ्या शेजारी कधी येऊन बसले ते मला कळलेच नाही. चित्र पाहून ते चिडतील असे वाटले पण त्यांनी माझ्या चित्राचे कौतुक केले.पायाचे दुखणे असलेल्या व्यक्तीने माझे व्यंगचित्र पाहिले. (Vijay Paradkar) चित्र पाहून पायाचे दु:ख विसरलो असे जेव्हा त्या व्यक्तीने सांगितले त्यावेळी ते माझ्या व्यंगचित्रासाठीचे सर्वात मोठे मानधन मिळाल्याची भावना झाली.

‘चिंटू’ला दाद

समारोप सत्रात आकर्षण ठरला तो ‘चिंटू’. चारुहास पंडित यांनी कागद आणि डिजिटल माध्यमातून ‘चिंटू’ साकरला. आपला आवडता आणि खट्याळ चिंटू साकारताना पाहून मुलांसह त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यवरही हास्य झळकले.

‘वेगळा विचार करताना’

पहिल्या सत्रात ‘वेगळा विचार करताना’ या उपक्रमाअंतर्गत व्यंगचित्रांचे प्रकार, शैली व माध्यम या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. युवा कलावंत सिद्धांत जुमडे, अतुल पुरंदरे, धनराज गरड आणि रवींद्र राणे हे व्यंगचित्रकार सहभागी झाले होते. चित्रात गोडवा राहिल याकडे बारकाईन लक्ष द्या, असे जुमडे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.