Dance Festival: डान्स फेस्टिव्हल मध्ये कथक,भरत नाट्यम् चे प्रभावी सादरीकरण

एमपीसी न्यूज: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ लाऊड अॅप्लॉज या डान्स मॅगझीनने तरूण कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी (Dance Festival)’ लाऊड अॅप्लॉज डान्स फेस्टिव्हल’ चे आयोजन केले होते. नृत्य गुरू स्वाती दैठणकर, नृत्यांगना शर्वरी जेमनीस, नेहा  मुथियान,डॉ.परिमल फडके यांच्या उपस्थितीत झालेल्या या डान्स फेस्टिव्हलला चांगला प्रतिसाद मिळाला.

 

 

हा कार्यक्रम रविवार, 31 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला. नृत्यांगना शर्वरी जेमनीस,नृत्य गुरु स्वाती दैठणकर , प्रा. नंदकुमार काकिर्डे,नेहा मुथियान यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.मान्यवरांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरी देऊन सत्कार करण्यात आला.

 

Pune dance

 

‘लाऊड अॅप्लॉज ‘ या डान्स मॅगझीनच्या संपादक आणि ‘कथक पाठशाला ‘ च्या संस्थापक नेहा मुथियान यांच्या संयोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘लाऊड अॅप्लॉज डान्स फेस्टिव्हल ‘ मध्ये कथक आणि भरत नाटयम् या नृत्यप्रकारांचे बहारदार सादरीकरण झाले.

 

 

Prohibited Gutka: मोशी येथे गुटखा विकणाऱ्या एकाला अटक

 

 

नृत्य गुरु नेहा मुथियान यांच्या ‘कथक पाठशाला ‘ या नृत्यसंस्थेच्या विद्यार्थिनींनी ‘ राधा माधव वंदना ‘ सादर केली. यामध्ये श्वेता राजोपाध्ये, निकीता कुलकर्णी, पल्लवी अभ्यंकर , सानिका चव्हाण सहभागी झाल्या होत्या. यामधे कथक आणि भरत नाटयम्  या नृत्यप्रकारांचे बहारदार सादरीकरण झाले.(Dance Festival) भरत नाटयम्  गुरु डॉ.परिमल फडके, गौरी दैठणकर , गांधर्व महाविद्यालयाच्या उपप्राचार्य परिणीता मराठे हे  मान्यवर उपस्थित होते.अभिषेक धावडे,कीर्ती कुरांडे,ईशा नानल,पूजा भट्टड,अनंगा मंजिरी,रिद्धी पोतदार,अथर्व चौधरी,वैष्णवी पुणतांबेकर सहभागी झाले होते.

 

 

रुचा ढेकणे यांनी सूत्रसंचालन केले.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. कथक  पाठशाला ‘ च्या संस्थापक नेहा मुथियान यांनी आभार मानले.

 

‘ प्रेक्षकांची दाद म्हणजेच ‘ लाऊड अॅप्लॉज ‘. नृत्यासाठी असे विशेष मॅगझीन सुरु करणे ही कल्पना खूप कौतुकास्पद आहे. तसेच एकल नृत्य स्पर्धा आयोजित करणे हे ही एक वेगळेपण आहे.(Dance Festival) गेली आठ वर्षे हे मॅगझीन सुरू आहे. या मॅगझीनमध्ये शास्त्रीय नृत्य विषयक विचारांची मालिका दिसून येते, अशा शब्दात ” लाऊड अॅप्लॉज ‘ या डान्स मॅगझीनच्या संपादक आणि ‘कथक  पाठशाला ‘ च्या संस्थापक नेहा मुथियान यांचे कौतुक करून लाऊड अॅप्लॉज डान्स फेस्टिव्हल’ च्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी नृत्य गुरू स्वाती दैठणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

 

 

कथक नृत्यांगना शर्वरी जेमनीस आपल्या मनोगता मधे बोलताना म्हणाल्या, ‘ लाऊड अॅप्लॉज या नृत्य विषयक मॅगझीन मधून शास्त्रीय नृत्याचा प्रसार करण आणि प्रबोधन करण हे खूप मोठ काम आहे.(Dance Festival) नृत्याचा सर्वांगिण विचार आणि प्रामाणिक प्रयत्न या मॅगझीनमध्ये दिसून येतो. नेहा मुथियान यांचं खूप कौतुक आहे, गेली आठ वर्ष हे मॅगझीन त्या चालवत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.