Prohibited Gutka: मोशी येथे गुटखा विकणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज : प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने एका व्यक्तीला अटक केली आहे. (Prohibited Gutka) ही कारवाई शनिवारी (दि. 30) दुपारी आदर्शनगर मोशी येथे करण्यात आली.

अनुज गंगा महतो (वय 48, रा. गव्हाणेवस्ती, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रमोद गर्जे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Adv. Sachin Bhosale: राज्यपाल कोश्यारी यांना भाजपने प्रवक्ते पदी नेमावे : ॲड. सचिन भोसले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशरयुक्त पानमसाला, आर एम डी पानमसाला, ए सेंटेड तंबाखू गोल्ड असा ऐवज विक्रीसाठी निघालेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. (Prohibited Gutka) त्याच्याकडून एक दुचाकी आणि तीन हजार 120  रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.