Adv. Sachin Bhosale: राज्यपाल कोश्यारी यांना भाजपने प्रवक्ते पदी नेमावे : ॲड. सचिन भोसले

एमपीसी न्यूज: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने परत बोलावून त्यांची भाजपच्या प्रवक्ते पदी नेमणूक करावी. मागील कार्यकाळात आणि काल देखील राज्यपाल यांनी महाराष्ट्र विषयी, महाराष्ट्रातील जनतेविषयी अपमान जनक वक्तव्य केले आहे. (Adv. Sachin Bhosale) राज्यपाल पद हे संविधानात्मक पद आहे. या पदावर कोश्यारी यांची भाजपाने नेमणूक केली आहे. त्यांच्या मनात महाराष्ट्र बाबत असणारी खदखद ते व्यक्त करीत आहेत. खर तर त्यांच्या तोंडून भाजपाचे नेतेच बोलत आहेत. भाजपने आता त्यांना दिल्लीत परत बोलावून भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ते पदावर  नेमणूक करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनाप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली.

 

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईत एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील जनतेचा अवमान करणारे वक्तव्य केले होते. त्यांचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनाप्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली (Adv.Sachin Bhosale) आज रविवारी 31 जुलै ला पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौका येथो शहर शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोश्यारी यांचा निषेध केला.

 

 

MLA Laxman Jagtap: वायसीएमबाबत वाढत्या तक्रारी या अशोभनीय- आमदार लक्ष्मण जगताप

 

 

यावेळी उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, महिला जिल्हा संघटिका शैलजा खंडागळे, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, शहर प्रसिद्धी प्रमुख भाविक देशमुख, विधानसभा प्रमुख अनंत कोराळे, महिला विधानसभा संघटिका कल्पना शेटे, सरिता साने, युवासेना विधानसभा अधिकारी माऊली जगताप, निलेश हाके, शहर संघटक रोमी संधू , उपशहर प्रमुख तुषार नवले, संतोष पवार, नवनाथ तरस, पांडुरंग पाटील, हरीश नखाते, नेताजी काशीद, सचिन चिंचवडे, उपविभाग प्रमुख कुदरत खान,  शाखाप्रमुख व महिला आघाडी शाखा संघटिका प्रमोद दर्शले, अझरुद्दीन मुजावर, इत्यादी शिवसेना महिला आघाडी युवासेना आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

 

यावेळी ॲड. उर्मिला काळभोर निषेध करताना म्हणाल्या की, राज्यपाल यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेचा अपमान केला आहे. राज्यपालांनी पालक म्हणून काम करावे, परंतु ते भाजपाचे प्रवक्ते पदाधिकारी असल्यासारखे वक्तव्य करतात. या राज्यपालांनी या पदाची लायकी घालवली आहे. (Adv. Sachin Bhosale) या पदावर कसे वागावे याचे त्यांना ज्ञान नाही. महाराष्ट्राचा इतिहास त्यांना माहित नाही. राज्यपालांनी जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे यांचे चरित्र वाचावे असेही ॲड. उर्मिला काळभोर म्हणाल्या.

 

 

तसेच यावेळी गुलाब गरुड, निलेश मुटके आदी व इतर पदाधिकारी यांनी राज्यपालांचा निषेध करणारी भाषणे केली. तसेच सर्व शिवसैनिकांनी राज्यपालांचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.