MLA Laxman Jagtap: वायसीएमबाबत वाढत्या तक्रारी या अशोभनीय- आमदार लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सोई-सुविधा आणि वैद्यकीय सेवेबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी वाढत आहेत. ही बाब श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शोभनीय नाही. (MLA Laxman Jagtap) त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांसाठी चांगल्या मुलभूत सुविधा, दर्जेदार वैद्यकीय उपचार, सर्व आजारांवरील औषधे, आवश्यक डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात यावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

 

 

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  या तक्रारींना रुग्णालयातील वैद्यकीय सेवा व उपलब्ध सुविधा तसेच अपुरे मनुष्यबळ कारणीभूत ठरत आहे. रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना लागणारे वैद्यकीय साहित्य तसेच आधुनिक वैद्यकयी साधने उपलब्ध नाहीत. रुग्णांवर रात्रीच्या वेळी शस्त्रक्रीयेसाठी रांगेत उभे राहण्याची वेळ येत आहे.

 

Pune Dance event: खणम व भाटे यांच्या नृत्याने रंगला ‘बेल्स इन रेझोनन्स’

 

नवीन केस पेपर, औषधे घेणे, वैद्यकीय बिले भरण्यासाठी रुग्ण संख्येच्या तुलनेत काऊंटर अपुरे पडत आहेत. रुग्णांना हेल्थ कार्ड वाटप बंद करण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात दाखल होण्यासाठी रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.(MLA Laxman Jagtap) परिणामी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात येणारे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त होत आहेत. या रुग्णालयाबाबत त्यांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

 

 

या सर्व तक्रारींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असून रुग्णालयात चांगल्या मुलभूत सुविधा, वैद्यकीय सेवा, आवश्यक डॉक्टर्स व कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्यात यावी.(MLA Laxman Jagtap) त्याचप्रमाणे यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करुन रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा दर्जेदार करण्याबाबत चर्चा व्हावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.