Students Felicitation: पिंपरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम

एमपीसी न्यूज: पिंपरी येथील श्री.संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रभाग क्रमांक 30 व पिंपरी परिसरातील इयत्ता 10 वी व 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम तसेच परिसरातील (Students Felicitation) गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, श्री.संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दरवर्षी पिंपरी परिसरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणेसाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. त्याच अनुषंगाने याही वर्षी इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे तसेच परिसरातील गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप समारंभाचे आयोजन बुधवार दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता पिंपरीतील संदीप वाघेरे जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आलेले आहे. शालेय साहित्यामध्ये लॅपटॅाप आयपॅाड पेन ड्राईव्ह कंपास नोटबुक यांचे वाटप करण्यात येणार आहे.

 

Bhosari Land Fraud: जमीन विक्री प्रकरणात 90 लाखांची फसवणूक

 

तसेच सदर कार्यक्रमा दरम्यान प्रसिद्ध व्याख्याते डॉ. गणेश शिंदे यांचे करिअर मार्गदर्शन होणार आहे. (Students Felicitation) याकरिता नावनोंदणी दिनांक 1 ऑगस्ट 2022  ते 9 ऑगस्ट 2022 पर्यंत जनसंपर्क कार्यालय येथे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.