Bhosari Land Fraud: जमीन विक्री प्रकरणात 90 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : जागेचे कुलमुखत्यारपत्र स्वतःच्या नावावर करून विक्रीबाबतचे अधिकार स्वतःकडे असल्याचे सांगून 90 लाख रुपयांची फसवणूक केली. (Bhosari Land Fraud) हा प्रकार सन 2019 ते 18 जानेवारी 2022 या कालावधीत भोसरी आणि रास्तापेठ पुणे येथे घडला.

संजय जनार्दन लांडगे (वय 54, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 30) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वृंदा बिल्डर्स डेव्हलपर्सचे प्रोप्रा जयवंत नारायण अतकरे (रा. बावधन खुर्द, ता. मुळशी), युनायटेड चर्च ऑफ नॉर्दन इंडिया ट्रस्ट असोसिएशनचे सचिव स्टीफन सिंह (रा. उत्तर प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari Schools: भोसरी येथील शाळांमध्ये दहावी गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून युनायटेड चर्च ऑफ नॉर्दन इंडिया ट्रस्टच्या ताब्यातील रास्तापेठ पुणे येथील एक हेक्टर 25.33 आर 12 हजार 433 चौरस मीटर मिळकत विकायचे असल्याचे सांगितले. त्याबाबत आरोपींनी फिर्यादी आणि भागीदार रणजित नरसिंहराव पिसाळ देशमुख, सागर आल्हाट यांच्याशी वेळोवेळी बोलणी केली.(Bhosari Land Fraud) स्टीफन सिंह याने जागेचे कुलमुखत्यारपत्र त्याच्या नावे करून देऊन त्याचे सर्व अधिकार त्याच्याकडे असल्याचे बनावट प्रमाणपत्र दाखवून फिर्यादी आणि भागीदारांचा विश्वास संपादन केला. जागेच्या विक्रीबाबत मेमोरँडम ऑफ अंडरस्टॅण्डिंग करून 90 लाख रुपये स्वीकारून त्याचे करारनामे भीमराव दौलतराव माळवे, अजित प्रभाकर कानडे, नयन शहा, पंकज शहा यांच्याशी करून फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.