pune : मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार फरार…

एमपीसी न्यूज – सिंहगड रोड, सनसिटी येथे मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र काल (दि 26) रात्री आठच्या सुमारास हिसकावले व फरार झाले. याप्रकरणी महिलेने (वय 52, रा. सिंहगड रोड, पुणे) सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी या त्यांच्या पतीसह क्लिनिकमधून उपचार घेऊन पायी घरी जात असताना मोटारसायकल वरुन दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. व त्यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून पळून गेले. सिंहगड रोड पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.