Dighi : अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; वृद्धाला अटक

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या एका 65 वर्षीय वृद्धाला दिघी पोलिसांनी गजाआड केले. तसेच आरोप पत्र देखील दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज (शनिवारी)सकाळी दिघी येथे घडली.

महादेव एकनाथ गोरे (वय 65, रा. दिघी) अटक केलेल्या या वृध्दाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गोरे हे शनिवारी सकाळी एकटेच होते. शाळेत जाण्याच्या तयारीत असलेल्या ओळखीच्या 13 वर्षीय मुलीला नाश्‍ता देण्याच्या बहाण्याने घरात बोलविले. त्यानंतर तिचा विनयभंग केला. तिच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केले. तसेच आरोपपत्र दाखल केले. दिघी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.