Pune- आता वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांवर नजर ठेवणार बॉडी कॅमेरा

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून पुन्हा करवाईदरम्यान वाहतूक पोलीस आणि अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या वर लक्ष ठेवण्यासाठी आता वाहतूक शाखेने बॉडी कॅमेराची सोय केली आहे.

पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूक चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांची जबाबदारी देखील वाढली आहे. दरम्यान ही जबाबदारी पार पाडत असताना वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना काही उद्धट आणि बेशिस्त वाहनचालक कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांशी वाद घालतात एवढेच नाहीतर कारवाई करू नये म्हणून त्यांना धमक्या देखील देतात.त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकाना चपराक बसवण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे वाहतूक पोलीस आणि अधिकाऱ्यांना बॉडी कॅमेरे देण्यात आले आहेत. या कॅमेराच्या मदतीने नियमभंग करणाऱ्या आणि वादविवाद करणाऱ्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येतील व संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येतील आणि पुरावा म्हणून बॉडी कॅमेरात रेकॉर्ड केलेले व्हिडीओ वापरण्यात येतील.
त्यामुळे आता नागरिकांनी नियमभंग न करता वाहतूक सुरळीत करण्यात योगदान द्यावे व वाहतूक पोलीस आणि कर्मचाऱ्यांशी वाद घालू नये असे आवाहन करण्यात आले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.