Chakan News : अपघात व वाहतूक कोंडीने नागरिक संतप्त; पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको

एमपीसी न्यूज : चाकण (Chakan News) वाहतूक कोंडी विरोधी कृती समिती तर्फे गुरुवारी (दि. 15) पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण येथील आंबेठाण चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, आप आदी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. शासनाच्या भूमिकेच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करत विरोध करण्यात आला. चाकणमधील आंदोलनाचा इतिहास पाहता पोलिसांनी या भागात खूप मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. रस्त्यांच्या रखडलेल्या कामांच्या बाबत अनेक संतप्त प्रतिक्रिया या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी व्यक्त केल्या. मोठ्या संखेने कार्यकर्ते सहभागी झाल्याने सर्व पक्षीय चक्का जाम आंदोलन यशस्वी झाल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. खेड तालुका कृती समिती दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार असून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे.

दरम्यान कृती समितीद्वारा दिलेल्या निवेदनाची (Chakan News) दाखल केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने घेतली असून राज्य शासनाकडून पीएमआरडीएद्वारा खेड तालुक्यातील निवेदनात नमुद काही रस्ते व पुल यांना निधी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. केंद्र सरकार पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग व तळेगाव दाभाडे – शिक्रापूर नवीन राष्ट्रीय महामार्ग कामाबाबत कामाचा सविस्तर आराखाडा सह काम पूर्ण करण्याबाबतची कालमर्यादा स्पष्ट करणार असल्याचे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग समन्वयक दिलीप मेदगे यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी येऊन सांगितले.

Today’s Horoscope 16 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आंदोलन पोलीस प्रशासन यांचे विनंतीवरून संपल्याचे कृती समिती अध्यक्ष कुमार गोरे यांनी घोषित केले. दरम्यान या आंदोलनाने पुणे नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सर्वपक्षीयांच्या या आंदोलनास चाकणकर जनतेने देखील मोठा पाठिंबा दिला. या आंदोलनात अतुल देशमुख, कुमार गोरे, राम गोरे, जमीर काझी, अॅड. निलेश कड काळूराम कड, मुबीन काझी, राजन परदेशी, अनिल देशमुख, अनिल (बंडू) सोनवणे, अमृत शेवकरी, लक्ष्मण वाघ, चंद्रकांत गोरे, बाळासाहेब गायकवाड, विशाल नायकवाडी, भरत कानपिळे, संजय गोरे, दत्ता गोरे, अमोल जाधव, प्रीतम शिंदे, अशोक जाधव, नितीन जगताप आदी सर्वपक्षीय सहभागी झाले होते.

…म्हणून आंदोलनाचा पवित्रा :

चाकण वाहतूक कोंडी विरोधी कृती समिती तर्फे केंद्र, राज्य सरकार यांना चाकण व खेड तालुक्यातील सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्ग कामे व एकात्मिक विद्यमान रस्ते विकास करण्यासाठी निवेदन 15 दिवसापूर्वी देण्यात आले होते. त्यावर कोणतेही ठोस आश्वासन लेखी स्वरूपात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने न आल्याने सर्वपक्षीयांनी आंदोलन केले. तातडीने या बाबतची कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष कुमार गोरे, भाजपचे अतुल देशमुख, कॉंग्रेसचे जमीर काझी, निलेश कड आदींनी दिला आहे.

Fursungi : प्रेमप्रस्ताव नाकारल्याने अल्पवयीन मुलीवर विवाहित तरुणाचा हल्ला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.