Chakan : चाकण एमआयडीसीसाठी सक्तीच्या भूसंपादनास विरोध ; शासनाच्या नोटीसीची होळी

शेतकरी आक्रमक

एमपीसी न्यूज-चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक – 5 साठी सक्तीने भूसंपादनास शेतकऱ्यांनी जोरदार विरोध सुरु केला आहे. शासनाने याबाबत शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसींची होळी करून शासनाच्या धोरणाचा (Chakan) जोरदार निषेध काल (दि. 3) चाकण येथे करण्यात आला.

 

चाकणमध्ये जमलेल्या शेतकर्यांनी सांगितले की,  सन 2002 रोजी विमानतळ होणार म्हणून आयताकृती संपादन करण्यात आले.  तेव्हा विमानतळाची धावपट्टी आणि विमानतळ करण्यासाठी म्हणून हे शिक्के टाकण्यात आले होते. परंतु सन 2017 रोजी शासनाने लॉजिस्टिक पार्क करायचा असे सांगून विमानतळाचे जे संपादन होते त्यातील काही गट वशिलेबाजी करून सोडले. आता ज्या शेतकऱ्यांच्या खरोखर बागायत शेती आहे,  ज्यांना खरोखर शेतीच करायची त्यांची संपादनात संमती नाही अशा शेतकऱ्यांवर शासन सक्ती लादत आहे.

MPC News Editorial : ‘राम भरोसे’ रेल्वेमंत्री आणि केवळ गप्पांमध्येच अडकलेले सुरक्षा ‘कवच’

ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सक्तीने जमिनीचा ताबा घ्यायचा असेल त्यावेळी आमच्या छाताडावर गोळ्या घाला आणि मग तुमचा ताबा घ्या अशा तीव्र भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त करत शासनाने याबाबत शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसींची होळी करून शासनाच्या धोरणाचा जोरदार निषेध करण्यात आला.

 

यावेळी शेतकरी नेते जयप्रकाश परदेशी, कॉंग्रेसचे निलेश कड पाटील, राष्ट्रवादीचे राम गोरे, मुबीन काझी, भरत पवळे, अनिल देशमुख, भरत गोरे, दत्ता गोरे, मंदार परदेशी, अमोल  जाधव, सचिन पडवळ, दशरथ काचोळे, नवनाथ चौधरी, दिलीप डोंगरे, सागर काचोळे आदींसह बाधित गावातील शेतकरी उपस्थित होते.
———

शासनाच्या सक्तीने भूसंपादनाच्या धोरणाच्या विरोधात टप्पा पाच मधील गावातील शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे करण्यात येणार असून, वेळप्रसंगी रक्तरंजित आंदोलन उभे करण्यात येईल.

-जयप्रकाश परदेशी , शेतकरी नेते

एम आय डी सी ने फक्त गुंतवणूक आणावी बाकी संपादन करणे सोडावे, कारण पुणे प्रदेश महानगर यांना पण जरा काम करू द्या . कायम 17  विभाग व्यस्त करून काम बिघडू नये आता शेतकरी हुशार आहेत ते सरकारच्या फसव्या धोरणाला भुलणार नाही. त्यांना एकदाच नुकसान भरपाई घेऊन करोडपती व्हायचे नाही. तर कायमस्वरूपी उत्पन्न त्यांना हवे आहेत.
– ॲड.निलेश शंकर कड पाटील, प्रवक्ता,जिल्हा काँग्रेस,पुणे

 

आमच्याकडे एमआयडीसी बैठक इतिरुत्त आहे ज्यात सरकारने सांगितले ज्यांची संमती त्याच जमिनी घेऊ सक्ती करणार नाही मग सरकार आता बळजबरी का करत आहे?
– नवनाथ चौधरी, बाधित शेतकरी बिरदवडी

 

विमानतळ होणार असे सांगितले ते आवश्यक होते. त्यासाठी आवश्यक जागा घ्यावीच लागते. पण लॉजिस्टिक्स पार्क कुठेही होऊ शकतो.   त्यासाठी सलग जमीन संपादन करावीच असे नाही. एमआयडीसी चाकण टप्पा क्रमांक 1,2,3,4 मध्ये ज्या बागायती जमिनी त्या संपादनमध्ये आल्या तरी सोडल्या मग आताच सक्ती का ? आम्हाला  जमीन द्यायची नाही आणि देणार नाही.
( सचिन पडवळ, बोरदरा )

 

शेतकऱ्यांच्या शेतात फळ बाग आहे. त्यातून चांगले उत्पन्न मिळते पण सक्तीने संपादन झाले तर अनेकजण भूमीहीन होणार आहे.  मग एमआयडीसीचे एखादा कोटी घेऊन काय करायचे . यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.
( अनिल देशमुख , बाधित शेतकरी, चाकण )

 

बागायत जमीन सक्तीने संपादन करणारे सरकार खरंच शेतकऱ्याचे सरकार आहे का? शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे.
( राम गोरे , शहराध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस )

 

एजंट आणि भूमाफिया यांनी मागील काही वर्षात काहीशे एकर जमीन खरेदी केली. त्या जमिनी रस्ता (Chakan) नसलेल्या आणि बागायती नव्हत्या. मग अशा लोकांनी संमती दिली म्हणजे शेतकरी संमती मिळाली असे सरकार मानत आहे हे चुकीचे आहे.
( दशरथ काचोळे,बाधित शेतकरी रोहकल) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.