Talegaon-Chakan Potholes- तळेगाव-चाकण महामार्गावर खड्डे भरण्याचे काम, वाहनचालकांना दिलासा

एमपीसी न्यूज : म्हाळुंगे वाहतूक विभाग, ग्रामपंचायत खालुंबरे, ग्रामपंचायत खराबवाडी व येथील स्थानिकांच्या मदतीने तळेगाव – चाकण महामार्गाचे खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. (Talegaon-Chakan Potholes) यामुळे वाहनचालकांचा त्रास कमी होणार आहे.

 

तळेगाव – चाकण महामार्ग हा सुमारे 23 किलोमीटर लांब असून तळेगाव व चाकण या दोन औद्योगिक शहरांना जोडतो. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या महामार्गावर छोटे तसेच मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करवा लागत आहे.

 

गेला आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबकी तयार झाली होती. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन दररोज हजारो कामगार व स्थानिक नागरिकांना त्रास होत होता. तसेच यामुळे अपघाताचा धोका वाढला होता. (Talegaon-Chakan Potholes) यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायाच्या म्हाळुंगे वाहतूक विभागाने पुढाकार घेत ग्रामपंचायत खालुंबरे,  ग्रामपंचायत खराबवाडी व स्थानिकांच्या मदतीने खड्डे बुझवण्यास सुरुवात केली आहे.

 

 

चंद्रशेखर चौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हाळुंगे वाहतूक विभाग म्हणाले की,पावसामध्ये खड्डयांमुळे महामार्गांवरली वाहतुकीचा वेग मंद होऊन वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत खालुंबरे,ग्रामपंचायत खराबवाडी व स्थानिकांनी तळेगाव – चाकण महामार्गाचे खड्डे बुझवण्याचे काम गेले आठवडाभर करत आहोत. तळेगाव चौक, सारा सिटी, म्हाळुंगे, प्रदीप लॅमिनेटर्स, खालूबरे व इतर ठिकाणच्या मोठ्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून जेसीबी ने पसरवण्यात आले आहे. उद्योजक गणेश बोत्रे, संदिप येळवंडे, दादा येळवंडे आणि इतर युवकांनी यासाठी मदत केली. त्यामुळे धोकादायक खड्डे कमी होऊन वाहनचालकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.