Pune Vehicle Fire: पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी तीन गाड्यांनी घेतला पेट

एमपीसी न्यूज: पुणे शहरात आज (बुधवारी) तीन वेगवेगळ्या ठिकाणी गाड्यांनी पेट घेतला.यामध्ये दोन दुचाकी व एक स्कूल व्हॅचा समावेश आहे. (Pune Vehical Fire) अग्निशामक दलाकडून तिन्ही ठिकाणी लागलेली आग विझवण्यात आली असून यात कोणीही जखमी झालेले नाही.

 

 

Sharvari Dingrajkar: शर्वरी डिग्रजकर -पोफळे यांना शिवाजी विद्यापिठाकडून संगीत विषयातील पीएच.डी

 

 

यात कात्रज येथे भारती विद्यापीठ समोर एका दुचाकीने (ज्युपिटर) पेट घेतला होता. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली. मात्र यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरया घटनेत सकाळी नऊ वाजता कात्रज-कोंढवा रोड येथे सुंदरबन जवळ उभ्या असणाऱ्या एका स्कुल व्हॅनने पेट घेतला होता. (Pune Vehicle Fire) तातडीने अग्निशमन दलाने आग विझवली. तसेच मुकुंदनगर, सुजय गार्डन जवळ एका दुचाकीला (स्कुटी) आग लागल्याने दुचाकी जळून खाक झाली आहे. अग्निशामक दलाकडून तिन्ही ठिकाणची आग विझवण्यात आल्या आहेत. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.