Chikhali : चिटफंड मधील भिशीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – चीटफंड मधील भिशीमध्ये गुंतवणूक करण्यास (Chikhali)सांगत भिशीचा कालावधी संपल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ करून नागरिकांची फसवणूक केली. हा प्रकार जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत पूर्णानगर, चिखली येथे घडला.

ॲड. गणेश रामभाऊ राऊत (वय 34, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष रामदास बरबडे (वय 39, रा. मोशी प्राधिकरण, मोशी) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khed : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे राजरत्न चीटफंड (Chikhali)प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी राऊत आणि इतर नागरिकांना चिटफंडमधील भिशी योजनेत गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक लाभांश देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी आणि त्या अन्य नागरिकांनी राजरत्न चीटफंडमधील भिशीमध्ये गुंतवणूक केली. भिशीची मुदत संपल्यानंतर लाभांशासह रक्कम देण्यास आरोपींनी टाळाटाळ केली. त्यानंतर फिर्यादी आणि अन्य नागरिकांची फसवणूक होण्याच्या उद्देशाने त्यांना न वटणारे धनादेश दिले. आरोपींनी एकूण 16 लाख 33 हजार 800 रुपये रकमेचा अपहार करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.