Moshi : दुकानाच्या काउंटरवरून चावी घेऊन दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज – दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली(Moshi) चावी घेऊन एका व्यक्तीने दुचाकी चोरून नेली. ही घटना दोन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास जसवंत स्वीट मार्ट, मोशी येथे घडली.

 

दिनेश मुलाराम चौधरी (वय 35, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामचंद्र शिखरे (वय 50, रा. आदर्श नगर, मोशी. मूळ रा. बारामती) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khed : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मोशी (Moshi)मधील सेक्टर क्रमांक चार येथे जसवंत स्वीट मार्ट नावाचे दुकान आहे. दोन ऑक्टोबर रोजी ते आपल्या दुकानात असताना त्यांनी दुचाकीची चावी दुकानाच्या काउंटरवर ठेवली होती. आरोपी फिर्यादी यांच्या दुकानांमध्ये आला. त्याने काउंटरवर ठेवलेली दुचाकीची चावी घेतली आणि बाहेर येऊन फिर्यादी यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.