Chikhali : तिन लाखांच्या गुटख्यासह व्यावसायीकाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे विक्रीसाठी तीन लाख रुपयांचा(Chikhali) गुटखा घेऊन जात असताना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.1) चिखली येथे दुपारी कऱण्यात आली आहे.

राजेश सावलाराम चौधरी (वय 43 रा. चिखली) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकऱणी चिखली पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार सुनिल बबन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

Alandi: श्री ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक संगणक साक्षरता दिन साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Chikhali)आरोपी हा त्याच्या होंडासिटी कारमधून बेकादेशीर रित्या गुटख्याचे पुडे व सिल्व्हर टोबॅको अशा एकूण 3 लाख 17 हजार 325 रुपयांचा गुटखा विक्रीसाठी घेऊन जात होता. यावेळी पोलिसांनी त्याला गाडीसह ताब्यात घेत गुटखा जप्त केला आहे. याचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.