Pune : कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या’ या विषयावर रविवारी परिसंवाद

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित (Pune) ‘कथा कीर्तन महोत्सव’ चा समारोप रविवार, 3 डिसेंबर रोजी होत असून त्यानिमित्त ‘कीर्तन परंपरा – काल, आज व उद्या’ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, माध्यमतज्ज्ञ प्रा.डॉ. विश्राम ढोले, तत्वज्ञान व प्राच्यविद्या यांचे अभ्यासक डॉ. प्रणव गोखले सहभागी होणार असून ह .भ. प. प्रा. अभय टिळक हे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत.सकाळी 10 ते 12 दरम्यान भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहामध्ये हा परिसंवाद होणार आहे.

Alandi: श्री ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक संगणक साक्षरता दिन साजरा

याच दिवशी सायंकाळी सहा वाजता (Pune)कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. प्रारंभी 6 वाजता भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षा लीना मेहंदळे यांचे ‘महाभारतातील किर्तन परंपरा’ यावर व्याख्यान होणार असून त्यानंतर ठाणे येथील युवा कीर्तनकार अमेय बुवा रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर होणार आहे.

भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय विद्या भवन तर्फे करण्यात आले आहे. प्रवेश मोफत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.