Chikhali : …तर महापालिका अधिका-यांना मैलामिश्रित पाणी देवू..

चिखली-मोशी -पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचा इशारा

एमपीसी न्यूज – चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील सोसायट्यांना ड्रेनेज लाईनचे पाणी पिण्याच्या (Chikhali) पाण्याच्या लाईनमधे मिक्स होऊन मैलामिश्रित दूषित पाणी येत आहे. त्यामुळे जलजन्य आजार पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा. अन्यथा अधिका-यांनी मैलामिश्रित पाणी पिण्यासाठी देण्याचा इशारा  चिखली-मोशी -पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनने दिला आहे.

याबाबत फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.  त्यात त्यांनी म्हटले आहे की,  चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील अभंग विश्व फेज-1,अभंग विश्व फेज-2,मिरा ऑर्किड, भागीरथी ग्लोरिया ,गवारे अंगण या सर्व सोसायट्यांमधे मैलामिश्रित पाणी येत आहे. या सर्व सोसायट्यांमधील लहान मुले,महिला,वयोवृद्ध नागरिक हे जुलाब ,उलट्या यासारख्या आजाराने त्रस्त आहेत. या भागातून जाणारी ड्रेनेज लाईन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची पाण्याची लाईन एकावरून एक जात असल्याने ड्रेनेज लाईनचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईन मध्ये मिक्स होत (Chikhali) आहे.

Nigdi : यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला 5 कोटींचा निधी

याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, ड्रेनेज विभागाचे अधिकारी यांना कळविले होते. परंतु, दोन्ही विभागाकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या परिसरातील 4 हजार नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. लवकरात लवकर हे ड्रेनेजचे  मिक्स होणारे पाणी शोधून काढावे. जोपर्यंत हे मिक्स होणारे पाणी सापडत (Chikhali) नाही.  तोपर्यंत या भागातील सोसायटी धारकांना टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करावा.

चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील या सहा सोसायट्यांमधे मागील पंधरा दिवसापासून मैला मिश्रित दूषित पाणी येत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाला फोटो पाठवले होते. परंतु यावर काहीही ॲक्शन घेतली नाही. महापालिकेच्या प्रशासनाने नागरिकांकडून फक्त करवसुली करून घेण्याचे काम चालू ठेवलेले आहे असे दिसते. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम महानगरपालिकेचे प्रशासन विसरले आहे. हे मिक्स होणारे दूषित पाणी लवकर शोधून काढून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा  केला नाही. तर, आमच्या फेडरेशन मार्फत हेच मैला मिश्रित पाणी घेऊन जाऊन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पिण्यासाठी दिले जाईल, असा इशारा सांगळे (Chikhali)  यांनी दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.