Chinchwad : अॅ्डव्होकेट्स बार असोसिएशनकडून दुय्यम निबंधक कार्यालयात काम बंद आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या (Chinchwad) वतीने शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवारी (दि. 14) काम बंद आंदोलन करण्यात आले. दस्त नोंदणीतील अडचणी सोडविण्याच्या तसेच अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज सुमारे 50-60 दस्त नोंदणीसाठी सादर केले जातात. मात्र दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व्हर वारंवार बंद अथवा संथ असते. त्यामुळे दस्त नोंदणी होत नाही. याचा पक्षकार आणि वकील यांना नाहक मनस्ताप होतो. दुय्यम निबंधक कार्यालयातील अडचणींमुळे पक्षकार आणि वकिलांच्या वेळेसह त्यांचे आर्थिकही नुकसान होते.

दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व्हर अत्याधुनिक करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवड अॅ्डव्होकेट्स बार असोसिएशनने सोमवारी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. बार असोसिएशनने निगडी, चिंचवड, भोसरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात निवेदन देखील दिले.

Nigdi : यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला 5 कोटींचा निधी

नोंदणी कार्यालयात नोंदणी अधिकारी आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी वकिलांसोबत उद्धटपणे व मानहानीकारक बोलणे थांबवले पाहिजे. दस्त नोंदणी कार्यालयातील ऑपरेटरचा मनमानी कारभार थांबला (Chinchwad) पाहिजे. महिला व कनिष्ठ वकिलांची अडवणूक थांबवून महिलांना योग्य वर्तणूक दिली पाहिजे. नोंदणी कार्यालयात पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृह, महिलांसाठी प्रतीक्षा कक्ष अशा सुविधा निर्माण करणे, सकाळी पावणे दहा वाजता दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरु करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.