Shirgaon : शिरगाव पोलिसांनी गोमांसाने भरलेली कार पकडली

एमपीसी न्यूज – शिरगाव पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से येथे गोमांसाने भरलेली कार पकडली. त्यात सुमारे एक लाख रुपये ( Shirgaon ) किमतीचे गोमांस आहे. ही कारवाई रविवारी (दि. 13) सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास करण्यात आली.

एमएच 06/एएस 4931 या स्विफ्ट गाडीचा चालक आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार महादेव कवडे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chikhali : …तर महापालिका अधिका-यांना मैलामिश्रित पाणी देवू..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गोमांसाने भरलेली कार शिरगाव पोलिसांनी पकडली. कारच्या समोरून पोलीस येत असल्याचे पाहून कार मधील दोघेजण कार सोडून पळून गेले. पोलिसांनी कारची पाहणी केली असता त्यात गोमांस सदृश एक लाख रुपये किमतीचे मांस आढळून आले.

पोलिसांनी मांसाने भरलेली कार जप्त केली आहे. विनापरवाना प्राण्यांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस ( Shirgaon ) तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.