Nigdi : यशवंतराव चव्हाण स्मारक समितीला 5 कोटींचा निधी

एमपीसी न्यूज  – निगडी, प्राधिकरण येथील संत तुकाराम उद्यानाशेजारी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ( Nigdi) उभारण्यात येत असलेल्या स्मारकासाठी  5 कोटी रुपये अनुदान देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानंतर 5 कोटींचा निधी देणगी स्वरूपात देण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मंजुरी दिली.

थेरगाव येथे 16 जूनला झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 5 कोटी निधीची देण्याची मागणी केली होती. समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी स्मारकासाठी पालिकेने 5 कोटींचे अनुदान द्यावे, असे पत्र दिले होते.

Pimpri : मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट वेलणकर यांचा अजय भट्ट यांच्या हस्ते सन्मान

निगडी येथील 44 गुंठे जागेत यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा, ग्रंथालय, वाचनालय, सांस्कृतिक ( Nigdi) भवन गोरगरीब व अनाथ मुलांसाठी वसतीगृह, वधू- वर सूचक मंडळ, विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र, वैद्यकीय उपचार केंद्र, व्यायामशाळा बांधण्यात येणार आहे. स्मारकाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी 20 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

स्मारकाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 88 व 66 (25) मधील तरतुदीनुसार स्मारक समितीस 5 कोटी रुपयांचे अनुदान अदा करणे आणि अनुदान या लेखाशीर्षावर वर्ग करण्यास आयुक्त सिंह यांनी 27 जुलैला सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मंजुरी दिली.

तो निधी देण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. त्याला राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानंतर तत्काळ आयुक्त सिंह यांनी 5 कोटींचा निधी देण्यास स्थायी समितीची मंजुरी दिली ( Nigdi) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.