Pimpri : मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट वेलणकर यांचा अजय भट्ट यांच्या हस्ते सन्मान

एमपीसी न्यूज – रक्षा व पर्यटन राज्य मंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते (Pimpri ) मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट वेलणकर यांचा सन्मान करण्यात आला. मंथन फाउंडेशन दुर्लक्षित, वंचित लोकांसाठी साठी काम करते. याचे कौतुक व प्रेरणा म्हणून हा सन्मान करण्यात आला.

यावेळी विशेष संस्कृती शाळेचे संस्थापक गिरिजाशंकर मुंगली, आमदार सिध्दार्थ शिरोळे, बिल्डर काकडे व कुमाऊँ मित्र मंडळ चे अध्यक्ष पी. सी.जोशी याबरोबरच कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, अनेक मान्यवर व मंथन फाउंडेशन चे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Mahalunge : पार्क केलेली बुलेट चोरीला

मंथन फाउंडेशन आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व महिला व बाल विकासासाठी काम करते. संस्था मुख्यतः वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला त्यांची मुले, ट्रक ड्रायव्हर, स्थलांतरित कामगार वर्ग, तृतीय पंथी व एचआयव्हीसह जगणाऱ्या मुले व व्यक्तींसाठी पुणे आणि नवी मुंबई येथे काम करत आहेत.

तसेच तहसीलदार रणजित भोसले , मुळशी, भुकुम, भूगाव व नांदगाव या ग्रामपंचायतींचा देखील उत्कृष्ट कामाबद्दल सन्मान करण्यात आला. विशेष कार्य करणाऱ्या  सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिक, राजकीय व देशसेवा करणाऱ्या मान्यवरांचा देखील यावेळी सन्मान करण्यात (Pimpri ) आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.