Chikhali : तरुणीला व तिच्या आईला शेजाऱ्यांकडून मारहाण

एमपीसी न्यूज – शेजाऱ्यांकडून किरकोळ (Chikhali) भांडणातून तरुणीला व तिच्या आईला हाताने, रॉडने व चाकूने मारहाण करत जखमी केले आहे. ही घटना 16 ते 17 डिसेंबर या कालावधीत चिखलीतील पाटील नगर येथे घडली आहे.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात 23 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली असून पोलिसांनी त्यावरून महिला आरोपी व विलास शिंदे (रा. चिखली) व योगेश देवकुळे (रा.चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

PCMC : महापालिका प्रशासनाच्या अनास्थेने माशांचा बळी – विजय पाटील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या भावाला आरोपी यांनी मारहाण केली होती. याबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी त्यांच्या घरासमोर असलेल्या आरोपीच्या घरी गेल्या. यावेळी आरोपी महिलेने फिर्यादी यांना डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करत जखमी केले. त्यानंतर शनिवारी (दि.17) फिर्यादी (Chikhali) यांच्या आईला घराबाहेर बोलावून शिवीगाळ करत आरोपी यांनी हाताने मारहाण कऱण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांची लहान बहिण अडवण्यास गेली असता आरोपींनी तिला देखील मारहाण केली व पाठीत चाकुने मारून तिलाही जखमी केले. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.