PCMC : महापालिका प्रशासनाच्या अनास्थेने माशांचा बळी – विजय पाटील

एमपीसी न्यूज – सहा दिवसांपूर्वी पवना नदीच्या (PCMC) केजुबाई बंधारा येथे मोठ्या प्रमाणात मासे मृत पावल्याने पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरण प्रेमींनी हळहळ व्यक्त केली. महापालिकेला नदी प्रदूषणबाबत 10 वर्षांपूर्वीच माहिती मिळाली असून याबाबत सन 2013 मध्येच त्यांनीच नदीच्या पाण्याबद्दल व गुणवत्तेबद्दल तपासणी अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात पवना नदीचे पाणी जलचरांसाठी, पिण्यासाठी व शेतीसाठी योग्य नसल्याचे सांगितले होते. असे असातानाही मागील दहा वर्षात महापालिका प्रशासनाने पर्यावरण अहवाल साधा वाचला देखील नाही. त्यामुळे महापालिका प्रशासानानेच या माश्यांचा बळी घेतला आहे, असा आरोप प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केला आहे.

याविषयी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली असून पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,

2013 च्या महापालिका अहवालामध्ये नदी पाणी तपासणी केलेल्या महत्वाच्या बाबी पुढील प्रमाणे आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ – अल्ट्राटेक एंनव्होर्नमेंट कन्सल्टंन्सी अँड लॅबोरेटरी ने पवना नदीच्या पाण्याचे विविध ठिकाणांहून नमुने गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने तज्ज्ञांकडून तपासणी केली होती. त्या सर्व नमुन्यांचा एकत्रित अहवाल 2013 साली प्रसिद्ध करण्यात आला होता.

1)पवना नदी ही मुळा व इंद्रायणी नदीपेक्षा जास्त प्रदूषित. (PCMC)

2) नाल्यांचे पाणी नदीत मिसळल्याने तसेच घरगुती सांडपाणी, औदयोगिक सांडपाणी नदीत मिसळल्यामुळे नदी प्रदूषणात भर पडते.

3) पाण्याची केमिकल ऑक्सिजन डिमांड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनानुसार (150 मि.ग्राम/लिटर) पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. पवना नदीच्या पाण्याच्या नमुन्यामध्ये केमिकल ऑक्सिजन डिमांड 150 मि ग्राम/लि पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास येते.

4) पवना नदीचा बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड(बीओडी) वारंवार 30 मि ग्राम/लिटर पेक्षा अधिक दिसून येत असल्याने हे पाणी शेतीसाठी अनुकूल नाही तसेच मासेमारी किंवा प्राण्यांसाठीही वापरायोग्य नाही.

5) मानवी हस्तक्षेप आणि नाल्यांचे पाणी मिसळल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते.

6) रात्री फायटोप्लॅनटनस मार्फत प्रकाश संयुषणलेशनाची क्रिया होत नाही ज्याचा परिणाम म्हणून ऑक्सिजन ची निर्मिती नदीच्या पाण्यात होत नाही.पाण्याच्या पृष्ठभागावर तसेच पाण्याच्या तळाशी असलेल्या या परस्थितीमुळे पाण्यातील मासे मोठ्या प्रमाणात मृत पावतात.

7) मासे जिवंत राहण्यासाठी डीओची पातळी नदीच्या पाण्यात 4 मि ग्राम/लि असणे गरजेचे.

या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ”प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागातर्फे दिनांक 13 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत पवना नदीच्या प्रदूषणाबाबत एक महत्वपूर्ण निरीक्षण केले गेले. त्याचा अहवाल दोन दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पवना नदी ही शहराची जीवन वाहिनी असून तिचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. नदीचे गटारीत रूपांतर होण्यामागे वाढते शहरीकरण व नदी स्वच्छता अभियानाची पालिकेला असलेली अनास्था ही प्रमुख कारणे प्रकर्षाने दिसून येत आहेत. आपल्याच प्रशासनाच्या अहवालास केराची टोपली दाखवून 10 वर्ष त्या अहवालाच्या निष्कर्षांवर दुर्लक्ष (PCMC) करणे म्हणजे फोजदारी गुन्हा ठरतो,” असेही पाटील यांनी म्हटले केले आहे.

Bopdev Ghat : बोपदेव घाटात झालेल्या खूनाचा उलगडा, आरोपी अटकेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.