Chinchwad : वाहतूक विभागाकडून कारवाईचा धडाका; 15 दिवसात सहा हजार अवजड वाहनांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक विभाग कारवाईसाठी (Chinchwad) सक्रीय झाला आहे. शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठराविक वेळेत शहरात जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

16 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत सहा हजार 178 जड अवजड वाहनांवर कारवाई करत 61 लाख 71 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे. हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क तर देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे आहेत. शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ पिंपरी येथे आहे.

World Cup 2023 : भारतीय संघाचा दणदणीत विजयासह उपांत्य फेरीत शानदार प्रवेश

त्यामुळे या भागात मालाची नेआण करणाऱ्या जड अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वाहनांमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच अपघातांची देखील संख्या वाढत आहे.

यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत जड अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी केली आहे. अशी वाहने शहरात दिसताच त्यावर कारवाई केली जात आहे.

ट्रिपल सीट प्रवास करणे, लक्झरी बसेस, ऑटो रिक्षा, नो पार्किंग, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर, विरुध्द दिशेने वाहने चालवणारी मंडळी आता वाहतूक पोलिसांच्या रडारवर आली आहे. यापुढील काळात अशा वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर म्हणाले, “पुढील काळात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर न्यायालयात खटले तसेच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. सर्वांनी नियमांचे पालन केले तर संभाव्य अपघातांचा धोका देखील अनेक पटींनी कमी होतो. स्वताच्या आणि इतरांच्या जीवाची काळजी (Chinchwad) प्रत्येकाने घ्यायला हवी.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.