Chinchwad : नववर्षानिमित्त सामाजिक विषयांवर जनजागृती करत एका कुटुंबाने केला जम्मू ते पुणे सायकल प्रवास

एमपीसी न्यूज – नववर्षाचे संकल्प सर्वच करतात पण ते स्वतः पुर्ते मर्यादीत असतात. पिंपरी-चिंचवडच्या (Chinchwad) खर्से कुटुंबीयांनीही नव वर्षाचा असाच एक संकल्प पूर्ण केला. पण, तो आपल्या पुरता न ठेवता सामाजिक भान जपत जनजागृती करणारा ठरला. नववर्षाचे औचित्य साधून पर्यावरण वाचवा आणि स्त्रियांचा आदर करावा हे संदेश घेऊन खर्से कुटुंबाने जम्मू ते पुणे असा सायकल प्रवास केला.

साधारण 3 जानेवारी ते 26 जानेवारी असा 23 दिवसात हा सायकल प्रवास पूर्ण केला. स्वतः सुरेश शिवाजी खर्से (वय 50) सध्या ऐरोफाईन पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी शितल सुरेश खर्से (वय 44)  या गृहिणी आहेत आणि मुलगा कौस्तुभ सुरेश खर्से (वय 18) सध्या बाबूराव रामचंद्र घोलप कॉलेज सांगवी  प्रथम वर्ष विज्ञान शाखा येथे शिक्षण घेत आहे.

Anil Babar : आमदार अनिल बाबर यांचे निधन

खर्से या विषयी बोलताना म्हणाले की, आम्ही 3 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत (Chinchwad) पर्यावरण वाचवा आणि स्त्रियांचा आदर करावा हे संदेश घेऊन जम्मू येथून सायकल प्रवास चालू केला. हा सायकल प्रवास जम्मू, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून हा सायकल प्रवास करून 26 जानेवारीला मोशी येथे या प्रवासाची सांगता झाली.

या प्रवासात पंजाब मधील सुवर्ण मंदिर तसेच बागा बॉर्डर तसेच पानिपत, कुरूक्षेत्र,  कर्नाल जयपूर आदी ठिकाणी भेट दिली. या राईड साठी आम्हाला मोशी सायक्लीस्ट ग्रुप इंडो अथलॅटीक सोसायटी निसर्ग सायकल मित्र, दहावी वर्षे 1988-89 स्वामी विवेकानंद विद्यामंदिर तसेच  दापोडी मधील मित्र मैत्रिणी यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.